HarshVardhan Patil on VidhanSabha : आमच्या कार्यकर्त्यांवर गेल्या 10 वर्षापासून अन्याय- हर्षवर्धन पाटील

Continues below advertisement

HarshVardhan Patil on VidhanSabha : आमच्या कार्यकर्त्यांवर गेल्या 10 वर्षापासून अन्याय- हर्षवर्धन पाटील

हे देखील वाचा

Ajit Pawar : 'मी एकतर शब्द देत नाही, दिला तर काही झालं तरी मागं हटत नाही'; अजित पवारांची नाशिकमध्ये तुफान फटकेबाजी!

नाशिक : मी शब्द फिरवत नाही. एकतर शब्द देत नाही,  दिला तर काही झाले तरी मागे हटत नाही, हा अजित दादाचा वादा आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे. अजित पवारांच्या उपस्थितीत कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघात (Kalwan-Surgana Vidhan Sabha Constituency) 736 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यातून ते बोलत होते. 

अजित पवार म्हणाले की, सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. तिथल्या विकासासाठी 82 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा, ही आमची भावना आहे. मी सत्तेला हापापलेला कार्यकर्ता नाही. तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे असल्याने 2 हजार 200 कोटींचा निधी कळवण आणि सुरगाणा या दोन तालुक्यांना दिला आहे. या आधीच्या आमदारांनी काय केले आहे? नितीन पवार आणि इतर आमदार माझ्या सोबत असल्याने मी निधी देऊ शकलो. महिलांना मान सन्मान मिळाला पाहिजे. आर्थिक बाबतीत महिला सक्षम झाल्या पाहिजेत. अडीच लाख पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना मदत देण्याची भूमिका मी मांडली. मोलमजुरी, धुणी भांडी करणाऱ्या माय माऊलींना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्यानंतर रक्षाबंधनाच्या जवळ दोन्ही महिन्याचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहेत, असे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थित महिलांना दिले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram