Harshiti Bhoir | पाच वर्षीय हर्षिती भोईरचा अनोखा विक्रम, प्रजासत्ताक दिनी पाच किल्ल्यांवर तिरंगा फडकवला | ABP Majha

सह्याद्रीच्या कुशीतील पाच किल्ल्यांवर पाच वर्षीय चिमुरडीने तिरंगा फडकवला. हा अनोखा विक्रम तिने प्रजासत्ताक दिनाला प्रस्थापित केला आहे. हर्षिती भोईर असं या चिमुकल्या गिर्यारोहकाचे नाव आहे. उरणच्या भेंडखळ इथल्या हर्षितीने लोणावळ्यालगतच्या पाच किल्ल्यांवर ही किमया साधली. पाच वर्षीय चिमुकले आपापल्या शाळेत जेव्हा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात व्यस्त होते, तेव्हा हर्षिती मात्र इतिहास घडवण्यासाठी लोणावळ्यात दाखल झाली होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola