Harshal Bhadane Patil Accident :ट्रकने चिरडलं,नंतर फरफटत नेलं,पत्रकाराच्या मृत्यूची हादरवणारी स्टोरी

Continues below advertisement

Harshal Bhadane Patil Accident :ट्रकने चिरडलं,नंतर फरफटत नेलं,पत्रकाराच्या मृत्यूची हादरवणारी स्टोरी

धुळ्यात झालेल्या अपघातात पत्रकार हर्षल भदाणे पाटील यांचा दुर्देवी मृत्यू झालाय. त्यांच्या मृत्यूच्या बातमीनं पत्रकार आणि राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडालीये. स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची दखल घेत कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. हर्षल यांच्या अशा अकाली जाण्यानं हळहळ व्यक्त होतेय. हर्षल भदाणे यांचा मृत्यू कसा झाला? अपघात नेमका कसा घडला? त्या रात्री नेमकं काय घडलं? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होतायत.

हर्षल भदाणे पाटील हे कुटुंबासह नवी मुंबईमधील खारघरमध्ये वास्तव्यास होते. ते मुळचे धुळ्याचे होते. धुळ्यातच त्यांचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात त्यांचा दुर्देवी अंत झाला. 

हर्षलचा मृत्यू कसा झाला? 

काही कामानिमित्त हर्षल आपल्या मुळगावी धुळ्यातील बोरकुंड येथे गेले होते. त्यांच्यासोबत अजून 2 जण प्रवास करत होते. गरताड गावाजवळ त्यांनी त्यांची कार उभी केली होती. दरम्यान एका भरधाव ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली. यावेळी हर्षल यांनी स्वतःला वाचवण्यासाठी कारमधून उडी मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी ते ट्रकच्या चाकाखाली सापडले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी आहेत.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram