Hardeep Puri On Refinery :चंद्रपुरात रिफायनरी उभारण्याच्या वक्तव्यावरुन पेट्रोलियम मंत्र्यांच घुमजाव
एकीकडे रिफायनरीचा एक भाग विदर्भाला मिळावा म्हणून प्रयत्न सुरु आहे. तर दुसरीकडे चंद्रपुरात रिफायनरी उभारण्याच्या वक्तव्यावरुन पेट्रोलियम मंत्र्यांनी घुमजाव केलंय. चंद्रपुरात रिफायनरी उभारण्याची घोषणा हरदीप पुरी यांनी गुरुवारी केलं होतं. त्यानंतर शुक्रवारी त्यांनी हा निर्णय आपण घेऊ शकत नाही, असं सांगितलं. २४ तासांत हरदीप पुरी यांनी ही दोन वेगवेगळी वक्तव्यं केली. पाहुयात ते काय म्हणालेत.