Harbour Railway Train Derails : कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा, 'या' एक्स्प्रेस रखडल्या

Continues below advertisement

कोकणात जाणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वे रखडल्याने प्रवाशांचा दिवा रेल्वे स्टेशवर खोळंबा झालाय. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी रेल्वे रोखून धरली. सुमारे ४० मिनिटे रेल्वे रोखून धरल्यानंतर प्रवाशांना रेल्वे ट्रॅक वरून बाजूला करण्यात रेल्वे पोलिसांना यश आलंय.  काल पनवेल आणि कळंबोलीच्या दरम्यान मालगाडीचे डबे घसरले होते. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गाड्या उशिराने धावत होत्या. तर आज अनेक गाड्या रद्द करण्यात आल्यात. तसंच पनवेल कळंबोली दरम्यान झालेल्या अपघातानंतर कोकण रेल्वेवर एक्स्प्रेस ट्रेन्सचा खोळंबा झालाय. जवळपास १३ एक्सप्रेस ट्रेन या रखडल्या असल्याची माहिती मिळतेय. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram