Harbhajan Singh: निवृत्तीच्या घोषणेनंतर क्रिकेटपटू हरभजन सिंग राजकारणाच्या पीचवर? ABP Majha

Continues below advertisement

निवृत्तीच्या घोषणेनंतर क्रिकेटपटू हरभजन सिंगची दुसरी इनिंग काय असणार याच्या चर्चा सुरु झाल्यात. त्यातच सोशल मीडियावर हरभजन सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्या भेटीचा फोटो व्हायरल झाला. त्यामुळे भज्जी राजकारणाच्या पीचवर दुसरी इनिंग सुरु करणार असल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र यावर आता हरभजनसिंगने स्पष्टीकरण दिलंय. क्रिकेटर या नात्याने सिद्धू यांची भेट घेतल्याची माहिती भज्जीने दिलीय. राजकारणात प्रवेश करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र विविध पक्षांकडून ऑफर्स आल्याची माहिती भज्जीने दिलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram