Nagpur : राणा दाम्पत्याकडून रामनगर परिसरातील पश्चिमेश्वर हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण
नागपूरः राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचं विघ्न असून ते दूर व्हावं म्हणून आम्ही संकटमोचन हनुमान यांच्याकडे प्रार्थना करत आहोत. असे विधान 36 दिवसानंतर विदर्भात परतलेल्या खासदार नवनीत राणा (Navneed Rana) यांनी केले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठना संदर्भात नाट्यमय घडामोडीनंतर खासदार नवनीन राणा आणि आमदार रवी राणा यांचे नागपूरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी स्वाभीमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यानंतर दोघांनीही रामनगर परिसरातील पश्चिमेश्वर हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठन केले. मंदिराच्या दिशेने येताना पोलिसांना त्यांचा ताफा अडवला होता असे आरोपही यावेळी आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी केले.