Nanded : Gunaratna sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांच्या मुलीच्या बारसं आणि एसटी कर्मचाऱ्यांची गर्दी

Continues below advertisement

16 डिसेंबर 2021 रोजी ऍड-गुणरत्न सदावर्ते यांची मुलीच्या बारसे आणि त्यांचे वडील निवृत्ती सदावर्ते यांची पुण्यतिथी होती. दरम्यान या बारसे कार्यक्रम प्रसंगी आप्तेष्ठ कमी तर एसटी कर्मचारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी नांदेड,परभणी,हिंगोली, लातूर ,उस्मानाबाद,बीड जिल्ह्यातून हजारो एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.दरम्यान या बारसे कार्यक्रमात बारशाचा कार्यक्रम कमी,पण एसटी विलीनीकरनाचा मुद्दा आणि त्यावरील भाषणे मोठ्या प्रमाणात झाली होती. तर या बारसे कार्यक्रमात एसटी महामंडळचे विलीनीकरण पाहिजे. अशा आशयाची गाणी व त्या गाण्यावर एसटी कर्मचारी ताल धरत असल्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या कार्यक्रमास मराठवाड्यातून जवळपास 25 ते तीस हजार कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली होती. तर यासाठी मिष्ठांनाच्या जेवणावळी ही उठल्या होत्या . 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram