Gun License Controversy: वादातले गुंडे, राजकारण उदंड; चक्रावणारी गुंतागुत Special Report

Continues below advertisement
काँग्रेसमधून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेले रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. फरार गुंड निलेश घायवळ याला चंद्रकांत पाटील यांचा आशीर्वाद असल्याचा दावा धंगेकरांनी केला. घायवळला पासपोर्ट कसा मिळाला, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत धंगेकरांनी चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते समीर पाटील यांचा निलेश घायवळसोबतचा फोटोही दाखवला. समीर पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावत पुरावे देण्याचे आव्हान दिले. या प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेने नवा ट्विस्ट आणला. सुषमा अंधारे यांनी आरोप केला की, धंगेकरांच्या पक्षातील मंत्री योगेश कदम यांनी निलेश घायवळच्या भावाला, सचिन घायवळला, शस्त्र परवाना दिला. धक्कादायक बाब म्हणजे, सचिन घायवळवर गंभीर गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी परवाना देऊ नये असा अहवाल दिला होता. यावरून सुषमा अंधारे यांनी "काय गृहमंत्री योगेश कदमांना गृहमंत्री म्हणून घेण्याचा अधिकार आहे का? तत्काळ राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा गृहराज्यमंत्रीपदाचा राजीनामा घेतला जावा." अशी मागणी केली. योगेश कदम यांनी मात्र सर्व बाबी तपासून परवाना दिल्याचे सांगत आरोप फेटाळले. धंगेकरांच्या आरोपांमागे त्यांच्या राजकीय प्रवासाची पार्श्वभूमी असून, या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola