Gulabrao Patil on Ajit Pawar : गुण कधी जुळतील हे ब्राम्हणाला विचारावं लागेल : गुलाबराव पाटील
अजित पवारांबद्दल मंत्री गुलाबराव पाटलांनी मिष्किल वक्तव्य केलंय.. अजित पवार पक्षांतर करतील, मात्र तिथी आणि गुण जुळत नाहीयेत असं गुलाबराव म्हणाले.. गुण कधी जुळतील ते ब्राह्मणाला विचारावं लागेल.. वरचा ब्राह्मण फार कठीण आहे असं गुलाबराव म्हणाले.. आता ब्राह्मण हा शब्द गुलाबरावांनी भटजी म्हणून वापरला, की कुठल्या नेत्याला उद्देशून वापरला, ते ठरवण्यास आमचे प्रेक्षक पुरेसे सुजाण आहेत.