Gulabrao Patil : पालकमंत्रिपदाबाबत Dada Bhuse, Bharat Gogawaleवर अन्याय: गुलाबराव पाटील
Gulabrao Patil : पालकमंत्रिपदाबाबत Dada Bhuse, Bharat Gogawaleवर अन्याय: गुलाबराव पाटील
पालकमंत्री पदाच्या साठी दादा भुसे आणि गोगावले यांचेवर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे दादा भुसे हे आमच्या पक्षातील ज्येष्ठ मंत्री आहेत,तर गोगावले हे तीन वेळा आमदार झाले आहे,कोकणातील चेहरा आहे यांना पालक मंत्री पद मिळायला हवे होते पालकमंत्री पदाची निवड झाल्याच्या नंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे बीड चे पालकमंत्री हे अजित पवार यांची निवड झाल्याच्या बद्दल ,तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे,या बाबत बोलू इच्छित नसल्याचं ही गुलाबराव पाटील यांनी म्हटल आहे तीन पक्षाच्या सरकार मधे आपल्याला जनतेच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने तिसऱ्या पालक.मंत्री पद मिळाले ही दुर्मिळ गोष्ट आहे पालकमंत्री पदाची अपेक्षा असली तरी आपण त्याची कुठेही मागणी केली नव्हती जिल्ह्यात आता चार मंत्री असल्याने जिल्ह्याचा चांगला विकास होईल,विकासाला आपण प्राधान्य देणार आहे मागील पाच वर्षात ही आपण जनता आणि अधिकाऱ्यांशी समन्वय साधून विकास करण्याचा प्रयत्न केला होता, मागील काळात आपल्या कडून काही चूक झाल्या असतील,मात्र विकास कामांना आपला प्राधान्य क्रम राहिला आहे जिल्ह्यात तीन मंत्री असल्याने पालक मंत्री पदाच्या साठी रस्सी खेच असल्याचं सांगितलं जातं असल तरी त्यात तथ्य नाही अस ही मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटल आहे