Gudi Padwa : गुढीपाडव्यानिमित्त सराफ बाजारपेठा सजली, सुवर्णनगरीत जळगावात लगबग
पाडव्याच्या निमित्ताने जळगाव चे सुवर्ण नगरीत सोने खरेदीचा मोठा मुहूर्त मानला जातो यावेळी पारंपरिक दागिन्यांच्या डिझाईन ला मोठी मागणी असल्याचं पाहायला मिळतं. यंदा मात्र यात मोठा बदल झाला असल्याचं दिसून येतं असून पाश्चात्य पद्धतीच्या दागिन्यांना ही आता मोठी निर्माण झाल्याने अनेक सोने व्यापाऱ्यांनी पाडव्या साठी अशा प्रकारचे दागिने विक्री साठी सज्ज करून ठेवले आहेत. गुढी पाडव्याचा मुहूर्त हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक प्रमुख मुहूर्ताला जात असतो या निमित्ताने अनेक जण शुभ कार्य करीत हा मुहूर्त साजरा करीत असतात जळगाव चे सुवर्ण नगरीत हा सोने खरेदीचा शुभ मुहूर्ताला जातो या दिवशी केलेली सोने खरेदी ही शुभ आणि बरकत देणारी असल्याची अनेक जणांची श्रद्धा असल्याने अनेक जण या मुहूर्तावर सोने खरेदी करीत असतात
पाडवा हा सोने खरेदीचा शुभ मुहूर्त असल्याने या दिवशी अनेक ग्राहक पारंपरिक पद्धतीच्या डिझाईन ची दागिने खरेदी करीत असल्याचं नेहमीच पाहायला मिळत असते
मात्र बदलत्या काळात अनेक तरुण आणि तरुणी हे विदेशात नोकरी आणि व्यवसाय निमित्ताने जात असल्याने त्यांच्या वर त्या ठिकाणी असलेल्या आवडी निवडीचा ही मोठा प्रभाव होत असल्याच दिसून आले आहे
आणि त्याचाच परिणाम म्हणून जळगाव चे सुवर्ण नगरीत आता भारतीय डिझाईन सोबत पाश्च्यात्य संसृतीचा ही मोठा प्रभाव होत असल्याच दिसून येत आहे
जळगाव चे सुवर्ण नगरीत आता कुवेती,कोरियन,पेशवाई ,सिंगापूर ,आणि अखाती देशात वापरल्या जाणाऱ्या डिझाईन ची मागणी मोठ्या प्रमाणत वाढली असल्यानं
सोने व्यवसाय करणाऱ्यांनी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर या दगिंनाना असलेली मागणी पाहता या प्रकारातील दागिन्यांच्या वेगवेगळ्या डिझाईन आपल्या दुकानात ठेवल्या असून पाडव्याचा हा मुहूर्त साधने साठी नव्या प्रकारात असलेले दागिने आपल्या दुकाना साठी सज्ज करून ठेवले आहे