Pratap Sarnaik Diwali Dharashiv : 'ही दिवाळी पूरग्रस्त शेतकऱ्यांबरोबर साजरी करणार', प्रताप सरनाईकांची दिवाळी, धाराशिवच्या पूरग्रस्तांसोबत

Continues below advertisement
धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) हे यावर्षीची दिवाळी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसोबत साजरी करणार आहेत. 'पालकमंत्री या नात्यानं वैयक्तिक स्वरूपात काहीतरी मदत प्रत्येक शेतकऱ्याला मिळावी यासाठी मी माझ्या सहकुटुंब, मुलांसह, नातवंडांसह, सुनांसह आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर निघालेलोय,' असे सरनाईक यांनी सांगितले. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, सरनाईक यांनी पालकत्व घेतलेल्या या जिल्ह्यातील पूरग्रस्तांना धीर देण्यासाठी ते आपल्या संपूर्ण कुटुंबासह जात आहेत. या दौऱ्यात पूरग्रस्तांना दिवाळीच्या फराळासोबतच जीवनावश्यक वस्तू, शेतीसाठी लागणारे साहित्य आणि मुलांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटपही केले जाणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola