Graphic Designer to Rikshawala| नोकरी गेली पण कमलेश कामतेकरने हार मानली नाही Special Report
Graphic Designer to Rikshawala| नोकरी गेली पण कमलेश कामतेकरने हार मानली नाही Special Report
सोशल मीडियावरची एक पोस्ट, एक प्रवास आणि सक्सेस स्टोरी.. मंडळी, ही गोष्ट आहे एका सुशिक्षित तरुणाची. त्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय. मूळचा पेशानं ग्राफिक्स डिझायनर असलेला हा तरुण सध्या रिक्षाचालक बनलाय. त्यानं चांगल्या पगाराची नोकरी का सोडली? त्याच्यावर नोकरी सोडून रिक्षा चालवण्याची वेळ का आली ? असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात निर्माण झालेत ना? चला जाणून घेऊयात तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका प्रेरणादायी प्रवासातून.
हे ही वाचा..
नागपूरमध्ये (Nagpur) अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रक पकडण्यात आले आहेत. अवैध वाहतूक करणारे ट्रक मुख्य राष्ट्रीय महामार्ग सोडून आडमार्गाने जात असताना कारवाई करण्यात आली आहे. रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्गाने मध्यप्रदेशला जात असताना ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणात भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले.
रॉयल्टी वाचवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग सोडून आडमार्गाने वाहतूक
भाजप आमदार आशिष देशमुख(Ashish Deshmukh) व स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी अवैध वाळू पकडण्यास पुढाकार घेतलाय. राख व सुपारी माफियांचे अवैध वाहतूक करणारे ट्रक पकडण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ट्रक पकडत असताना भाजप आमदार आशिष देशमुख हे ट्रक वर चढले. त्यानंतर त्यांनी ट्रकमध्ये असलेल्या मालाची पाहणी करत प्रतिक्रिया देखील दिली आहे. हे ट्रक मुख्य राष्ट्रीय महामार्ग सोडून आडमार्गाने रॉयल्टी वाचवत मध्यप्रदेशला जात असताना कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या निमित्ताने भाजपकडून स्थानिक काँग्रेस नेत्याची नाकेबंदी सुरू केल्याची चर्चा सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे स्थानिक पदाधिकारी पण या कारवाईत सहभागी होते.