Maharashtra Gram Panchayat Elections | निवडणुकीचा प्रचार संपला, आता मतदानाकडे लक्ष
Continues below advertisement
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार काल थांबला आहे. येत्या 15 जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 18 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. राज्यात 34 जिल्ह्यातील 14, 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडणार आहे. एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते. परंतु, कोविड-19 ची परिस्थिती उद्भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक घेण्यात येत आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Gram Panchayat Maharashtra Gram Panchayat Elections Maharashtra Elections Maharashtra Panchayat Election 2021 Maharashtra Gram Panchayat Chunav Election 2021