
Gram Panchayat Elections 2023 : धुळे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप 25 जागांवर विजयी
Continues below advertisement
Gram Panchayat Elections 2023 : धुळे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप 25 जागांवर विजयी
मुंबई : राज्यातील तब्बल 2 हजार 359 ग्रामपंचायतीचा (Maharashtra Gram Panchayat Election Result) निकाल समोर येत आहे. यात अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर पार पडणारी पहिलीच निवडणूक असल्यामुळे राज्यभरात चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. आमदार रोहित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, डॉ.संजय कुटे, शहाजी बापू पाटील या प्रस्थापितांना त्यांच्या मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मात्र ग्रामपंचायतीवर आपापल्या सत्तेचे दावे-प्रतिदावे केले आहेत.
Continues below advertisement