Gram Panchayat Elections 2023 : नागपूर - काटोल तालुक्यात भाजपनं खातं उघडलं, अनिल देशमुख गटाला हादरा
Gram Panchayat Elections 2023 : नागपूर - काटोल तालुक्यात भाजपनं खातं उघडलं Maharashtra Gram Panchayat Election Result 2023 Sarpanch Winner List Live : मुंबई : राज्यभरातल्या 2 हजार 369 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होणार आहे. तर 2 हजार 950 सदस्यपदांच्या तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकाही होत आहेत. सकाळी साडेसात वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल. तर मतमोजणी उद्या होणार आहे. मात्र गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असणार आहे. गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात 7 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होईल. राज्यात महापालिका निवडणुका रखडल्या आहेत. मात्र आगामी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने यावेळी जनतेचा कौल कोणाकडे आहे हे या निवडणुकांतून आजमावता येणार आहे. त्यामुळे या निवडणुकांना महत्त्व आहे.