Govt Order Issued to Give Classic Status to Marathi Language : मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतचा शासन आदेश जारी
Govt Order Issued to Give Classic Status to Marathi Language : मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतचा शासन आदेश जारी
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भातला शासन आदेश जारी, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याचं स्वप्न पूर्ण, मंत्री उदय सामंतांना शासनादेश प्राप्त
अभिजात भाषा कशी ठरवली जाते माहिती आहे का?
2004 साली जेव्हा नियम तयार केले गेले, तेव्हा त्या भाषेतील ग्रंथांची पुरातनता आणि हजार वर्षांच्या इतिहासाची नोंद असणं गरजेचं होतं. प्राचीन साहित्य/ग्रंथांचा एक भाग, ज्याला वक्त्यांच्या पिढ्यांकडून मौल्यवान वारसा म्हणून गणलं जाते. त्याचबरोबर साहित्यिक परंपरा मूळ असली पाहीजे आणि दुसऱ्या भाषेतून घेतलेली नसावी. या निकषावर तामिळ ही भाषा अभिजात भाषा म्हणून ग्राह्य धरली गेली.
नोव्हेंबर 2005 मध्ये अभिजात भाषेच्या निकषात सुधारणा करण्यात आली आणि संस्कृतला हा दर्जा मिळाला होता. अभिजात भाषा ठरवण्यासाठी त्या भाषेचा इतिहास हा दीड ते दोन हजार वर्षे जुना असणं गरजेचं आहे. प्राचीन साहित्य/ग्रंथांचा एक भाग, ज्याला वक्त्यांच्या पिढ्यांकडून मौल्यवान वारसा म्हणून गणलं जाते. दुसऱ्या भाषेतून सदर भाषा उसनी घेतलेली नसावी. तसेच त्याची एक स्वतंत्र साहित्य परंपरा असावी.प्राचीन भाषा आणि आधुनिक भाषेत फरक असणं गरजेचं आहे.