Sarpanch Election | जनतेतून होणारी सरपंच निवड अखेर रद्द, मंत्रिमंडळाचा निर्णय | ABP Majha
फडणवीस सरकारनं थेट जनतेतून सरपंच निवडण्यासंदर्भात केलेला कायदा ठाकरे सरकारनं रद्द केला. मात्र सरपंचाची निवडणूक थेट जनतेतूनच व्हावी असा ठराव मंजूर करत हजारो ग्रामपंचायतींनी ठाकरे सरकारला धक्का दिलाय. जवळपास 9 हजारहून अधिक ग्रामपंचायतींनी तसा ठराव मांडल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे यांनी दिलीय..