Indurikar Maharaj | वादग्रस्त वक्तव्यानंतर इंदोरीकर महाराजांची प्रतिक्रिया म्हणाले... | ABP Majha
Continues below advertisement
वाईट दिवस सुरु असल्यानं चांगल्या कामात त्रास होतोय, अशी प्रतिक्रिया वादग्रस्त वक्तव्यानंतर इंदोरीकर महाराजांनी दिलीय. बीडमधील एका कीर्तनात ते बोलत होते. यावेळी कीर्तनस्थळी महाराजांना पाठिंबा देणारे फलक लावल्याचे पाहायला मिळाले. पुत्रप्राप्तीसाठी सम-विषम तिथीचा फॉर्म्युला दिल्यानंतर कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर अडचणीत आले आहेत. या सर्व वादावर इंदोरीकरांनी आपल्या कीर्तनात भाष्य केलंय. दोन तासांच्या कीर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं, असं स्पष्टीकरण त्यांनी आपल्या कीर्तनात दिलं.
Continues below advertisement