Sarpanch Selection | ठाकरे सरकारचा सरपंच निवडीचा अध्यादेश राज्यपालांनी फेटाळला | ABP Majha
थेट जनतेतून सरपंच निवड रद्द करुन ग्रामपंचायत सदस्यांमधूनच सरपंचांची निवड केली जावी, हा महाविकास आघाडी सरकारचा अध्यादेश राज्यपालांनी फेटाळून लावला आहे. ठाकरे सरकारला हा मोठा दणका असून, यामुळं राज्य सरकार आणि राज्यपालांमध्ये ठिणगी पडल्याची चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सरकारनं थेट जनतेतून सरपंच निवड करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय रद्द करत जुन्याच पद्धतीनुसार, म्हणजे ग्रामपंचायत सदस्यांमधूनच सरपंचाची निवड करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला. तसेच, अध्यादेशही सरकारनं काढला होता. या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नकार दिला आहे.