Sanjay Raut On Governor : BJP च्या सांगण्यावरून राज्यपाल कोश्यारी राजकारण करतात

Continues below advertisement

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भाजपच्या इशाऱ्यावर राजकारण करत असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. राज्यपालांकडून राजकारण केले जात असल्याचे त्यांनी म्हटले. विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि बारा आमदारांच्या नियुक्तीसह इतर मुद्यांवरून राज्यपालांकडून महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा सुरू असते. ज्या पातळीवर त्यांच्या पक्षाने आणि राज्यपालांनी हा संघर्ष नेऊन ठेवला आहे इतिहासात त्याची काळया अक्षराने नोंद होईल असेही संजय राऊत यांनी म्हटले.घटना भंग करणाऱ्या व्यक्तीला पदावर ठेवणं हे आणिबाणीची आठवण करून देणारं असल्याचेही त्यांनी म्हटले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram