Uddhav Thackeray on Eknath Shinde : सरकार वाहून गेलं नाही, खेकड्यांनी धरण फोडलं
Continues below advertisement
उद्धव ठाकरे यांनी आवाज कुणाचा या पॉडकास्टमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केलीये. मुख्यमंत्री वारंवार दिल्लीत मुजरे करायला का जातात, ईर्शाळवाडीची घटना घडल्यावर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री दिल्लीत मुजरा करायला गेले, अशी टीका ठाकरेंनी केली. तसंच, गोवंश हत्याबंदी आणि समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावरून त्यांनी मोदींचा खरपूस समाचार घेतला. २०२४मध्ये हे सरकार पुन्हा सत्तेत आलं तर देशात लोकशाही राहणार नाही, आणि मग देशात पुन्हा निवडणुका होतील असं मला वाटत नाही, असंही ते पुढे म्हणाले.
Continues below advertisement