Crop Loss : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारचा दिलासा

Continues below advertisement

निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत करण्याबाबत  मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात शासन निर्णय काढून जिल्ह्यांना निधी वितरित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे आज मदत व पुनर्वसन विभागाने ७५५ कोटी रुपयांच्या निधीचे औरंगाबाद, अमरावती आणि पुणे विभागातील नऊ जिल्ह्यांना  वितरण करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या व निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने यातून दिलासा दिला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram