Alibaug : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी, 100 विद्यार्थांची असणार पहिली बॅच : ABP Majha
Continues below advertisement
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रायगडचे स्वप्न अखेर सत्यात उतरले आहे. अलिबाग उसर येथे सुरू होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्राने मंजुरी दिली आहे. मंजुरीचे पत्र हे 16 सप्टेंबर रोजी महाविद्यालयाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे शासकीय महाविद्यालयाची 100 विद्यार्थ्यांची पहिली बॅच यावर्षी सुरू होणार आहे. अशी माहिती पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. रायगडसह कोकणातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा असे आवाहनही पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे.
Continues below advertisement