Maharashtra : राज्यातील 16 शहरांचा वीज वितरण परवाना खासगी कंपन्यांकडे? ऊर्जा विभागाकडून हालचाली सुरु
सार्वजनिक वीज क्षेत्राला खासगीकरणाचे ग्रहण लागले असून राज्यातील 16 शहरांचा वीज वितरण परवाना खासगी कंपन्यांना मिळण्याची शक्यता आहे. ऊर्जा विभागाकडून याबाबत हालचाली सुरु असल्याची माहिती मिळतेय. हा परवाना मिळवण्यासाठी तीन खासगी कंपन्यांचे प्रयत्न सुरु असल्याचंही समजतंय. या संबंधित खासगी कंपन्यांनी विविध शहरांमधील वीजग्राहकांची संख्या, त्यांचा वीज वापर, मासिक बिल याची माहिती काढण्यास सुरुवात केलीय. खासगी कंपन्यांना वीज वितरणाचा परवाना दिल्यास त्याला राज्यभरातील वीज कामगार तीव्र विरोध करतील असा इशारा देण्यात आलाय.
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या Maharashtra Electricity ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Electricity Privatize