Ethanol : इथेनॉलला परवानगी, शेतकऱ्यांनी दिलासा; राज्यातील नेते म्हणतात...

Continues below advertisement

केंद्र सरकारने उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादन करण्यावर घातलेली बंदी मागे घेतली आहे. थेट उसाचा रस, सिरप, बी हेवी मोलॅसेसपासून ३३ टक्के इथेनॉल निर्मितीचं धोरण पुन्हा कायम करण्यात आलंय. मात्र, त्यासाठी साखरेची मर्यादा १७ लाख टन निश्चित करण्यात आली आहे. त्यातून साखर उद्योगाला काही प्रमाणात दिलासा मिळाला. तेल कंपन्यांशी झालेले करार लक्षात घेता एकूण ३५ लाख टन साखरेपासून इथेनॉलचे उत्पादन होईल, असा अंदाज होता. त्यातील १७ लाख टन साखर इथेनॉलकडे वळवायला केंद्राने परवानगी दिली आहे. म्हणजे यंदाच्या हंगामातील जी साखर इथेनॉलकडे जाणार होती त्यातील अजूनही निम्मी साखर देशाच्या बाजारपेठेत येऊ शकते. त्याचा दरावर परिणाम होऊ शकतो.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram