Government Job : सरकारी नोकरीतील पदोन्नती आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार: ABP Majha
Continues below advertisement
सरकारी नोकरीतील पदोन्नती आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. राज्यात अनुसूचित जाती, जमाती, भटके विमुक्त आणि विशेष मागास प्रवर्गांसाठीचं पदोन्नतीतील ३३ टक्के आरक्षण पुन्हा मिळणार की सेवाज्येष्ठतेनुसारच आरक्षण मिळणार याचा फैसला आज होणार आहे. राज्य सरकारनं पदोन्नतीतील आरक्षण रद्द करून हा कोटा खुल्या प्रवर्गातून भरण्याचा निर्णय घेऊन ७ मे २०२१ रोजी तसा अध्यादेश काढला होता. त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आलं. मुंबई उच्च न्यायालयानं सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करून तो रद्द करण्यास नकार दिला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात यावरील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालय त्यावर आज निर्णय देणार आहे.
Continues below advertisement