Devendra Fadanvis : आरक्षणाच्या कायदेशीरबाबींवर चर्चा झाली, फडणवीसांची माहिती
बैठकीत सर्व कायदेशीर पर्यायांवर विचार करण्यात आला. हे कायदेशीर पर्याय न्यायालयात कसे टिकू शकतील, यावर चर्चा झाली. या संदर्भात अधिकची माहिती मागवण्यात आली आहे. ती माहिती मिळाल्यानंतर पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल. कायदेशीर मार्ग शक्य असल्यास ते शोधण्याची सरकारची मानसिकता आहे. यावर सरकारचे काम सुरू आहे. विखे पाटील यांनी एक निवेदन दिले आहे. त्या निवेदनातून काय मार्ग निघू शकतो, याचा सरकार विचार करत आहे. सरकार कोणतीही आडमुठेपणाची भूमिका घेत नाही. सरकार कधीही कोणताही 'Ego' धरत नाही. त्यामुळे त्यातूनही जो काही मार्ग काढता येईल, तो काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. चर्चेसाठी कोणी समोर आल्यास लवकरच चर्चा होईल. "सरकार कधीही कुठला ईगो धरत नाही त्याच्यामुळे त्यातूनही जे काही मार्ग काढता येईल तो काढतोय," हे महत्त्वाचे विधान आहे.