Govari Samaj Morcha : गोवारी समाजाचा अनुसुचित जातीत समावेश करा, विधान भवनावर मोर्चा
Govari Samaj Morcha : गोवारी समाजाचा अनुसुचित जातीत समावेश करा, विधान भवनावर मोर्चा
गोवारी समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यात यावा या मागणीसाठी आज गोवारी समाजाच्या वतीने नागपूरच्या विधानभवनावर मोर्चा काढला. केंद्र सरकारच्या सूची प्रमाणे 1985 पर्यंत राज्यातील गोवारी समाज गोंडगोवारी जात प्रमाणपत्रामुळे अनुसूचित जमातीत येत होता. मात्र 1985 नंतर या समाजाला भटक्या विमुक्त प्रवर्गात टाकण्यात आले तेव्हा पासून गोवारी समाजाचा आरक्षणाचा लढा सुरु आहे. 1994 मध्ये या लढ्यात 114 गोवारी मोर्चेकऱ्यांचे चेंगराचेंगरीत जीव गेले होते. आज देखील हा समाज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. विधान भवनात आमच्या समाजाला प्रतिनिधित्व मिळत नसल्याने आम्हाला न्याय मिळत नसल्याची भावना या मोर्च्यात सहभागी झालेल्या मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केली. 20 हजाराच्या वर संख्येत निघालेल्या या मोर्च्याच्या आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.