Goregaon Fire Update  :  गोरेगावमध्ये भीषण आग, आठ जणांचा मृत्यू , पाच जणांची प्रकृती गंभीर

Continues below advertisement

Goregaon Fire Update  :  गोरेगावमध्ये भीषण आग, आठ जणांचा मृत्यू , पाच जणांची प्रकृती गंभीर

मुंबईच्या गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला असून ५८ जण जखमी झाले आहेत. जय भवानी इमारतीच्या पार्किंगमध्ये मध्यरात्री तीनच्या आसपास भीषण आग लागली होती. दरम्यान मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात  आलीये. तर जखमींच्या उपचारांचा खर्चही राज्य सरकार करणार आहे. जखमींवर सध्या कूपर आणि ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या भीषण आगीत ३० पेक्षा अधिक दुचाकी आणि ४ कार जळून खाक झाल्यात. तसेच तळमजल्यावरील काही दुकानंही जळून खाक झालेत. दरम्यान आग लागलेल्या इमारतीमधील सर्व रहिवाशांच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करण्याची सूचना पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिल्या आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram