Gopichand Padalkar On Jayant Patil :जयंत पाटील संपलेला विषय,जाळ घालून मोठ केला तरी होणार नाही

Continues below advertisement

Gopichand Padalkar speech in Kolhapur: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करा, अशी मागणी करणाऱ्या जयंत पाटील यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी तिखट शब्दांत टीका केली आहे. जयंत पाटील यांचे राजकारण संपत आले आहे. दिवा विझताना मोठा होता. तशी सध्या जयंत पाटील यांची अवस्था झाली आहे, असे वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केले. ते मंगळवार कोल्हापूर येथील सभेत बोलत होते. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर अत्यंत जहरी टीका केली. 

जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची गोष्ट मला सिरीयस वाटत नाही. ते जबाबदारीपासून का पळ काढत आहेत हे मला माहिती नाही. जयंतराव हा राजकारणातला संपलेला विषय आहे. सतत जाळ घालून मोठा करण्याचा प्रयत्न केला तरी काय उपयोग होणार नाही. दिवा विझताना मोठा होतो, तशी अवस्था जयंत पाटील यांची झालेली आहे. जयंत पाटील हा अनुकंपा तत्त्वावर राजकारणात भरती झालेला कार्यकर्ता आहे. जयंत पाटील यांनी कुठलाही संघर्ष केला नाही. कुठलाही मोठा प्रकल्प सांगलीसाठी आणला नाही. इतके वर्षे व्हीआयपी कॅबिनेट म्हणून ते राहिले होते. सायकल पंक्चर झाल्यानंतर पंक्चर काढता येते. मात्र, टायर फुटल्यानंतर टायर पूर्णपणे बदलावा लागतो, तशी अवस्था जयंत पाटील यांच्याबाबत झाली आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola