Morning Prime Time : मॉर्निग प्राइम टाइम : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा
Continues below advertisement
महाराष्ट्राचे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. 'देशाची फाळणी झाली तेव्हा हिंदू इकडे आणि मुस्लिम तिकडे पाठवा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, त्यावेळी केलं असतं तर आता मोर्चा काढण्याची वेळ आली नसती', असे वादग्रस्त वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. तर दुसरीकडे, हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची कार्यपद्धती नथुराम गोडसेप्रमाणे असल्याची जहरी टीका केली आहे. दरम्यान, ठाकरे बंधू उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) हे पुन्हा एकदा एकत्र आले असून, ठाणे महापालिकेविरोधात एकत्रित मोर्चा काढणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांना त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement