Sangli : ब्रम्हानंद पडळकरांनी हटवलं एसटी स्टॅण्डवरील अतिक्रमण, पोलिसात गुन्हा दाखल
सांगलीच्या मिरजमध्ये जागेचा ताबा आणि अतिक्रमण पाडण्यावरून वाद झाला.. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकरांनी अतिक्रमण पडल्याने वाद झाला... सदर वादग्रस्त जागेचा निकाल ब्रम्हानंद पडळकर यांच्या बाजुने लागलाय... त्यानंतर महापालिकेने नोटीस दिल्याने अतिक्रमण हटवल्याचा दावा पडळकरांनी केलाय... दरम्यान गाळे पाडल्याप्रकरणी ब्रम्हानंद पडळकरांसह 100 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय... दुसऱ्याच्या मालमत्तेत घुसुन मारहाण करणे, मालमत्तेचं नुकसान करणे, जमाव जमवणे यासह एकूण १२ कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.. तर ४ जेसीबीदेखील पोलिसांनी ताब्यात घेतलेत.