Gopal Shetty Withdrawal Nomination Form | माझी लढाई कार्यपद्धतीवर, गोपाळ शेट्टींची बोरिवलीतून माघार

Continues below advertisement

Gopal Shetty Withdrawal Nomination Form | माझी लढाई कार्यपद्धतीवर, गोपाळ शेट्टींची बोरिवलीतून माघार
मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे  निवडणूक लढवून आमदार मला व्हायचं नव्हतं  मात्र काही गोष्टींमुळे मला उमेदवारी अर्ज भरावा लागला  मी पक्ष सोडला नाही हे मी आधी सुद्धा सांगितले होते  भारतीय संस्कृती आणि हिंदू संस्कृती ही आपल्याला जोडण्याचे शिकवते तोडण्याचे नाही  अन्याय करू नये आणि अन्याय सहन सुद्धा करू नये हेच आपल्याला भगवत गीते मधून ज्ञान दिले आहे  त्यामुळे झाल्या गेलेल्या गोष्टी विसरून लोकहितासाठी काम करावं हीच शिकवण सुद्धा आपल्याला भगवत गीता मधून मिळते  त्या दिशेने आता आपण वाटचाल करूया  मतभेद कधी नव्हतेच  एका मुद्द्याला घेऊन जे काही चर्चा झाली ती योग्य जागी पोहोचली आहे  पक्ष फार मोठा आहे व्यक्ती लहान असतो पक्ष मोठा असतो  मी पार्टीच्या लोकांना सुद्धा हेच सांगेन माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर मला क्षमा करावे  काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईला स्लम मुक्त करण्याची घोषणा केली याने मी फार प्रभावित झालो  या पक्षात मी झोपडपट्टीचा विषय घेऊनच आलो होतो  मुंबई वाढत आहे बोरिवली चांगली होत आहे  फेरीवाल्यांच्या प्रश्नाला न्याय दिला पाहिजे  या सर्व गोष्टींना घेऊन आपण येत्या काळात काम करूया  स्लम मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अजेंडावर काम करत आहे यामुळे मी खरंच खूप प्रभावित झालो आहे  पक्षासाठी आता जे काही करावे लागेल यासाठी मी कटिबद्ध आहे  पियुष गोयल भारतीय जनता पार्टी एक मजबूत पक्ष आहे मजबूत संघटना आहे   देश हितासाठी आम्ही सर्व एक आहोत

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram