Gondia Sand Smuggling : गोंदियात वाळू तस्करी रोखण्यासाठी खुद्द जिल्हाधिकाऱ्यांचा रात्रीचा पहारा
Continues below advertisement
गोंदियातली वाळू तस्करी रोखण्यासाठी आता खुद्द अतिरिक्त जिल्हाधिकारीच रात्रीच्या वेळी करडी नजर ठेवतायत. गोंदियातील वैनगंगा, वाघ आणि पांगोली नद्यांमध्ये बारीक आणि पांढरी शुभ्र वाळू मिळते आणि तिला विदर्भात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सध्या लिलाव झाले नसल्यानं वाळू माफिया रात्री वाळूची चोरी करतात. त्यांना रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन शक्कल लढवलीय आणि थेट अधिकाऱ्यांनाच रात्रीचा पहारा द्यायला सांगितलंय. स्वतः जिल्हाधिकारीही पाहारा देणार आहेत. गोंदियात जिल्हाधिकाऱ्यांच्या या नव्या उपाययोजनांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश मोटघरे यांनी
Continues below advertisement