Gondia Online Game Scam : आरोपी Anant Jain च्या बँक लॉकरमध्ये सापडलं कोट्यवधींचं घबाड

Gondia Online Game Scam : आरोपी Anant Jain च्या बँक लॉकरमध्ये सापडलं कोट्यवधींचं घबाड

ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या अनंत उर्फ सोंटू जैन या बुकीच्या गोंदिया मधील चार लॉकरमधून नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने 4.54 कोटी रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने एवढं ऐवज जप्त केले आहे.. सोंटूने ऑनलाइन गेमिंग च्या माध्यमातून एका व्यापा-याची तब्बल 58 कोटींची फसवणूक केली होती. त्याने अशाच पद्धतीने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढल्याची माहिती तपासात पुढे येत आहे.. हे प्रकरण उघडकीस येऊन दोन आठवडे उलटले तरी अजूनही सोंटू दुबईतच आहे. तपासात माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चार लॉकरमधून सुमारे साडेचार कोटींचे रोकड व दागिने जप्त केले आहे. यापूर्वी सोंटूच्या गोंदिया येथील घरातून नागपूर पोलिसांनी 16 कोटी 59 लाख रुपये रोख, बारा किलो सोने व 294 चांदी जप्त केली होती. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण 31 कोटीची रोख रक्कम व दागिने जप्त केले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola