Gondia Car Accident : गोंदियात रस्त्याच्या कडेला बसलेल्या दोघांना भरधाव कारने उडवलं; CCTV समोर
Gondia Car Accident : गोंदियात रस्त्याच्या कडेला बसलेल्या दोघांना भरधाव कारने उडवलं; CCTV समोर
Gondia Hit And Run Accident : गोंदिया (Gondia) शहरातून अपघाताचा एक मोठी बातमी समोर आली आहे. यात भरधाव कारचा थरार बघायला मिळाला असून रस्त्याच्या कडेला बसलेल्या दोघांना या भरधाव कारने अक्षरक्ष: उडविले (Accident) आहे. या अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये (CCTV Camera) कैद झालेली आहे. गोरेगाववरून गोंदियाकडे येत असताना गोंदियातील पॉलिटेक्निक कॉलेज समोर भरधाव कारने रस्त्याच्या कडेला बसलेल्या दोन ट्रक ड्रायव्हर आणि एक सायकल स्वार इसमाला उडवले आहे. या घटनेत दोन ट्रक ड्रायव्हर आणि सायकल स्वार गंभीर जखमी झाला असल्याची माहिती पुढे आली आहे. तर या घटणेमुळे गोंदियात नव्यानं हीट अँड रनचा थरार बघायला मिळाला आहे.
भरधाव कारने तिघांना उडविले, गोंदियात हीट अँड रनचा थरार
प्राथमिक माहितीनुसार, घटनेतील कारचालक भरधाव वेगाने गोंदिया शहरातील गणेशनगरकडे जात असताना ही घटना घडली आहे. खोमेश उरकुडे (वय 24 वर्ष रा. कोसेटोला, गोरेगाव) असे असुन जखमी मध्ये हेमराज राऊत (वय 54 रा. कारंजा ) आणि कादीर शेख (वय 38 रा. फुलचुर) तर सायकल स्वार देखील गंभीर जखमी असून यांच्या वर एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. ही कार इतकी वेगात होती की त्यातील एक व्यक्ति लांबवर हवेत उडाल्याचेही बघायला मिळाले आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून हा अपघाताच्या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे