Gold Rate May Cross One Lakh : लवकरच सोनं एक लाखावर जाणार? दर वाढण्याची प्रमुख कारणं काय..?
Gold Rate May Cross One Lakh : लवकरच सोनं एक लाखावर जाणार? दर वाढण्याची प्रमुख कारणं काय..?
गुढी पाडव्यापासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना दिसतेय. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात सोन्याचा दर ९३.५०० हजार प्रति तोळा तर चांदीचा १ लाख २ हजारावर गेला आहे. जागतिक स्तरावर झालेली अनिश्चितता हे सोन्याचे भाव वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या काही धोरणांचा थेट सोन्याच्या दरावर पडतोय. असं असलं तरी सुद्धा सोन्याकडे एक शाश्वत गुंतवणुकीचा पर्याय म्हणून बघितला जातो परिणामी ग्राहकांकडून सोन्याची विक्री कुठे ही कमी झालेली नाही. आत्ता या सोन्याची किंमत १ लाख प्रति तोळा जाईल का यावर पी एन गाडगीळ अँड सन्स चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक यांच्याशी बातचीत केलीय