Gold Price Record High | सोन्याचे दर विक्रमी उंचीवर, सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर!
Continues below advertisement
सोन्याचे दर दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहेत. सोन्याच्या दरात पुन्हा एकदा दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. जीएसटी सह सोन्याचे दर एक लाख सव्वीस हजार सातशे रुपयांवर पोहोचले आहेत. रशिया युक्रेन युद्ध, गाजा इस्त्रायल युद्ध आणि अमेरिकन फेडरल बँकांचे व्याजदर कमी होण्याची शक्यता यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळले आहेत. परिणामी सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. वाढलेल्या दरांमुळे दुकानांमध्ये ग्राहक कमी दिसत आहेत. सोन्याचे दर सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. "येत्या काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होऊ शकते असा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे।" दिवाळीच्या तोंडावर होत असलेली ही वाढ सर्वसामान्य ग्राहकांसाठी अडचणीची ठरत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement