Amravati Gold Fraud: 'कमी भावात सोनं देतो', अमरावतीत महिलेची १ कोटी ११ लाखांची फसवणूक, चौघे अटकेत
Continues below advertisement
दिवाळीच्या तोंडावर झालेल्या एका मोठ्या फसवणुकीत, अमरावतीमध्ये एका महिलेला तब्बल १ कोटी ११ लाखांना गंडवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अमोल नेरकर, मनोहर नेरकर, प्रेम गावंडे आणि नितेश महल्ले या चौघांना अटक केली आहे. 'कमी भावात तुम्हाला सोनं देतो', असे आमिष दाखवून आरोपींनी या महिलेला चक्क बनावट सोनं दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी महिलेकडून घेतलेल्या पैशांमधून खरं सोनं खरेदी केलं. त्यानंतर त्यांनी बुलढाणा, खामगाव आणि अकोला येथील ज्वेलर्सकडे हे दागिने गहाण ठेवले. आरोपींकडून पोलिसांनी सुमारे ६१ लाख ७६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. सणासुदीच्या काळात सोन्याची खरेदी करताना नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगण्याचं आवाहन या घटनेमुळे केलं जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement