Gold and Silver Price News : चांदी चकाकली ! किलोचा भाव 91 हजारांवर; सोनंही महागलं

Continues below advertisement

Gold and Silver Price News : गेल्या महिनाभरापूर्वी सोन्या चांदीच्या भावात (Gold Price) कपात झाली होती. मात्र अमेरिकेतील अर्थव्यवस्था व फेडरल रिझर्व्ह बँकेने कमी केलेले व्याजाचे दर यामुळं दोनच दिवसात चांदीच्या भावात (ilver Price) प्रतिकीलो जवळपास 7 हजारांची वाढ झाली आहे. तर सोन्याच्या भावातही (Gold Price) प्रति तोळा 2 हजार रुपयांची वाढ झाली आहे. तज्ञांच्या मते गेल्या 1991 नंतर म्हणजे साडे तीन दशकांत अत्यंत कमी कालावधीत म्हणजे दोन दिवसात ही सर्वात मोठी वाढ आहे.

संपूर्ण देशात खामगाव येथील चांदीची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. आता खामगाव येथील बाजारपेठेत चांदी 91000 रू प्रति किलो तर सोने 75200 रू प्रति तोळे  मिळत आहे. मात्र ही दरवाढ दिवाळी पर्यंत स्थिरावेल अशी माहिती चांदीच्या व्यापाऱ्यांनी दिली आहे.

काल चांदीच्या दरात 4400 रुपयांची वाढ झाली होती

काल (13 सप्टेंबर) चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. काल एकाच दिवसात बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील खामगाव (Khamgaon) येथील प्रसिद्ध चांदीच्या बाजारपेठेत चांदीच्या दरात (Silver Price)  तब्बल 4400 रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram