Goa Election : उत्पल पर्रिकर पणजीतूनच लढणार, उत्पल पर्रिकरकरांची 'माझा'ला माहिती : ABP Majha
गोव्यात भाजपच्या यादीत पणजीतून उत्पल पर्रिकरांना उमेदवारी नाकारण्यात आलीय. त्याऐवजी त्यांना बिचोलीतून निवडणूक लढवण्याचा पर्याय भाजपनं दिलाय. पण उत्पल पर्रिकर यांनी पणजीतूनच निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं. एबीपी माझाशी बोलताना उत्पल पर्रिकर यांनी अन्य जागेवरून लढण्याचा कोणताही विचार नाही, असं स्पष्ट शब्दांत सांगितलंय. लवकरच आपली भूमिका जाहीर करू असं पर्रिकरांनी सांगितलं.