Goa Casino New Year Celebration गोव्यात 50% क्षमतेने कसिनोही सुरु, नववर्षाच्या स्वागताला गोवा फुल्ल
जगभरामध्ये कोरोना, ओमायक्रॉनची धास्ती असल्यामुळे अनेक देशामध्ये बंदी लावण्यात आली आहे. नव वर्षाच्या स्वागतासाठी लोक वेगवेगळ्या देशात जात असतात. यामुळे देशातच जिथे नियमात थोडी शिथीलता आहे. किंवा नाईट कर्फ्यु नाही अशा ठिकाणांना पसंती दिली आहे.
असचं एक राज्य आहे गोवा ज्याला लोकांची मोठी पसंती मिळताना दिसतीये. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात निर्बंध कमी असल्यामुळे पर्यटक गोव्याकडे वळले आहेत. गोव्यात 100 टक्के क्षमतेने हॉटेल्स, पब सुरू आहे. समुद्र किनाऱ्यांवर लोकांची मोठी गर्दी आहे.