Global Fintech Fest | ATM मधून आता COINS, छोट्या NOTES काढता येणार, UPI व्यवहारही
Continues below advertisement
मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये नव्या तंत्रज्ञानाची एटीएम यंत्रे पाहायला मिळाली. या यंत्रांमधून आता पाचशे रुपयांच्या नोटांसारख्या छोट्या रकमेच्या चलनी नोटा आणि चलनी नाणीही काढता येणार आहेत. प्रसंगी एटीएममध्ये डेबिट किंवा क्रेडिट कार्डऐवजी मोबाईलवरचे युपीआई अॅप वापरून आर्थिक व्यवहार करता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान किरस्टारमर यांनीही या ग्लोबल फिनटेक फेस्टला भेट दिली. आर्थिक व्यवहारांसाठी तंत्रज्ञान विकसित करण्यात आलेल्या अनेक गोष्टी या फेस्टमध्ये पाहायला मिळत आहेत. एटीएममधून कॉईन्स काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. छोटी रक्कम काढण्यासाठी ही मशीन उपयुक्त ठरेल. तीस रुपयांपर्यंतचे कॉईन्स काढता येतील. UPI अॅपद्वारे पेमेंट करून ही रक्कम काढता येईल. ऑटो किंवा भाजीपाला खरेदीसाठी ही मशीन्स उपयुक्त ठरतील.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement