Girish Mahajan अडचणीत? विजय पाटील अपहरण प्रकरणी तपासासाठी पुणे पोलीस जळगावमध्ये

या अपहरण प्रकरणात माजी मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर आरोप करण्यात आलेत, त्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पुणे पोलीस जळगाव धडकलेत. याप्रकरणी गुन्ह्यातील नऊ जणांच्या घराच्या झडतीसाठी आणि जबाब नोंदणीसाठी पुणे पोलिसांनी पहाटेपासून कारवाई सुरु केलीय. जळगाव शहरातील मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संचालक विजय पाटील यांनी , स्वतःचं अपहरण झाल्याची तक्रार 9 डिसेंबर 2020 रोजी दिली होती. गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरुन आपल्याला पुण्यात बोलवून अपहरण कऱण्यात आल्याचा आरोप विजय पाटील यांनी केला होता. पाटील यांच्या तक्रारीनंतर 29 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय. त्यापैकी 9 जणांवर मोक्का लावण्यात आलाय.  हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ असून बारा जानेवारीला सुनावणी अपेक्षित आहे.. दरम्यान या प्रकरणात लावण्यात आलेले आरोप खोटे असून विनाकारण गोवण्यात आल्याचा दावा गिरीश महाजन यांनी यापूर्वी केला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola