Girish Mahajan : डॉक्टरांचे प्रश्न आम्ही वॉर्ड लेव्हलवर सोडवणार, संप मागे घेताना महाजनांचं आश्वासन
Maharashtra Doctors Strike: मागील दोन दिवसांपासून सुरू असलेला राज्यातील निवासी डॉक्टरांचा (Maharashtra Resident Doctors Strike) संप संपुष्टात (Strike Called Off)आला आहे. संपकरी निवासी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने आज वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत मागण्यांबाबत चर्चा केली. या बैठकीत मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. निवासी डॉक्टरांच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी गिरीश महाजन यांनी सांगितले की, निवासी डॉक्टरांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. वसतिगृहसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असेही त्यांनी सांगितले. सकारात्मक आज आमची चर्चा डॉक्टरांसोबत झाली आहे. त्यांनी आता संप मागे घेतला असल्याचे महाजन यांनी सांगितले. आंदोलन करण्यापूर्वी मला भेटा असं देखील मी त्यांना सांगितलं आहे. आधी भेट झाली असती तर हा प्रश्न निर्माण झाला नसता असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.