Girish Mahajan on Anil Deshmukh : अनिल देशमुखांवर झालेली कारवाई योग्यच
अनिल देशमुख यांच्यावर करण्यात येत असलेली कारवाई योग्यच आहे कारण त्यांनी ज्या पद्धतीने आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले,मोका लावला हे सगळं खोटं असल्याचं सिद्ध झाले आहे ,त्यांनी जो अन्याय केला ते पाहता कारवाई योग्यच आहे
या मधे एकनाथ खडसे यांचा अनिल देशमुख यांच्यावर दबाव असल्याने त्यांना ही कारवाई करावी लागली असल्याचं अनिल देशमुख यांनी आपल्याला सागितले आहे
ते नाही म्हणत असतील तर त्यांना माझ्या समोर बोलायला सांगा अस ही महाजन यांनी म्हटल आहे
एकनाथ खडसे यांचा परिवारात सध्या कोण कुठे हे त्यांनाही कळत नाही आणि आपल्याला कळत नाही,एकनाथ खडसे आणि आपल्यात समेट घडण्याच्या बाबत रक्षा खडसे सांगत असल्या तरी आपल्याला या बाबत माहिती नसल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटल आहे
सध्या खडसे गोंधळले आहेत कोणत्या पक्षात जावं कोणत्या राहावे या साठी,त्यांनी कुठे जावं आणि राहावे हा त्यांचा प्रश्न आहे
भाजपा मधे त्यांना प्रवेश देण्याचा वरिष्ठांचा निर्णय असेल त्याला आपला विरोध नाही,ते दोन्ही कडे पाय ठेऊन काम करण्याचा प्रयत्न करत असल्याच मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटल आहे