Shrikant Wad : श्रीकांत वाड यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, गिरीश महाजनांची घोषणा ABP Majha
abp majha web team
Updated at:
15 Jul 2023 08:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रख्यात बॅडमिंटन प्रशिक्षक श्रीकांत वाड आणि अॅथलेटिक्समधील कुशल प्रशासक आदिल सुमारीवाला यांना राज्य शासनाचा शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. श्रीकांत वाड यांना २०१९-२० या वर्षासाठी,
२०२०-२१ वर्षासाठी दिलीप वेंगसरकर तर आदिल सुमारीवाला यांना २०२१-२२ या वर्षासाठी शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाच्या वतीनं क्रीडाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणारे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार काल जाहीर करण्यात आलेत. २०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ या तीन वर्षांसाठीचे हे पुरस्कार मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केले. त्यात श्रीकांत वाड आणि आदिल सुमारीवालांच्या शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्काराचाही समावेश होता.