Samruddhi Highway Accident : शंभर फुटांवरून कोसळला गर्डर लॉन्चरसह गर्डर आणि स्लॅब, कामगारांचा मृत्यू

समृद्धी महामार्गाच्या निर्माण कार्यात पुन्हा एकदा दुर्घटना घडली आहे, शहापूर जवळ सरलांबे-खुराटी गावांच्या नजदीक गर्डर लाँच करणारी क्रेन खाली कोसळली सोबत अकरा गर्डर देखील खाली कोसळले, त्यामुळे सतरा मजुरांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, क्रेन आणि सिमेंटचे गर्डर यांचे वजन जास्त असल्याने पोकलेन आणि गॅस कटर च्या माध्यमातून ते बाजूला काढले जात आहेत, त्याखाली आणखीन काही मजूर असण्याची शक्यता आहे, हे सर्व नेमके कसे झाले असा प्रश्न अनेकांना पडला आहे, याचे उत्तर देण्याचा प्रयत्न एबीपी माझाच्या टीमने केला आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola